Skip to main content

Posts

Showing posts from April, 2025

म्युच्युअल फंड (SIP) गुंतवणूक: उद्दिष्ट आधारित गुंतवणुकीचे महत्त्व

  म्युच्युअल फंड (SIP) गुंतवणूक: उद्दिष्ट आधारित गुंतवणुकीचे महत्त्व आजच्या धावपळीच्या जगात आर्थिक स्थैर्य आणि भविष्याची सुरक्षितता मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने गुंतवणुकीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. मात्र केवळ गुंतवणूक करणं पुरेसं नाही, ती गुंतवणूक उद्दिष्ट आधारित असणं अधिक महत्त्वाचं आहे. यासाठी म्युच्युअल फंड हा एक विश्वासार्ह पर्याय ठरतो. म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड हा एक सामूहिक गुंतवणुकीचा पर्याय आहे जिथे अनेक गुंतवणूकदार आपले पैसे एका फंडात गुंतवतात आणि तो फंड एक तज्ञ फंड मॅनेजर विविध शेअर्स, बाँड्स, डेब्ट आणि इतर वित्तीय साधनांमध्ये गुंतवतो. यामध्ये जोखीम कमी करण्यासाठी विविधता (Diversification) असते आणि गुंतवणुकीचे व्यवस्थापन तज्ञांद्वारे होते. गुंतवणुकीचे उद्दिष्ट असणे का गरजेचे आहे? गुंतवणूक करताना अनेक लोक "माझे पैसे वाढावेत" या एकाच विचारात गुंतवणूक करतात. पण गुंतवणूक करताना स्पष्ट उद्दिष्ट असणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे खालील गोष्टी साध्य करता येतात: स्पष्ट दिशा मिळते: उद्दिष्ट माहीत असल्याने आपण कोणत्या प्रकारचा फंड निवडायचा हे ठरवता येते. ...

फुल टाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी किती भांडवल हवे?

स्टॉक मार्केट ट्रेडिंग करून खूप सारे ट्रेडर्स चांगला फायदा मिळवतात, सुरुवातीस ते पार्ट टाइम ट्रेडर म्हणून काम करत असतात पण नंतर जसा त्यांचा अनुभव वाढतो त्यानंतर ते फुल टाईम ट्रेडर म्हणून सुद्धा काम करू लागतात आणि खूप चांगला फायदा कमवतात.  पण तुम्हालाही जर असं वाटत असेल तर खालील गोष्टी समजून घ्यायला हव्यात. नोकरीत गुंतून राहण्यापेक्षा ट्रेडिंग करून अर्निंग करणे हा खूप चांगला पर्याय. परंतु अजिबात अभ्यास न करता या क्षेत्रात उडी घेऊ नये यासाठी काही गोष्टींची आवश्यकता आहे तसेच भांडवलाची आवश्यकता आहे याची संपूर्ण माहिती घ्यावी. भावनिक भांडवल:  ट्रेडिंग या क्षेत्रात सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे भावनिक भांडवल. यात प्रामुख्याने कितीही दबावाखाली योग्य निर्णय घेण्याची क्षमता, सातत्याने शिकण्याची तयारी व नुकसान सहन करण्याची मानसिकता असावी लागते. पुरेसे आर्थिक भांडवल  सातत्याने उत्पन्न मिळवण्यासाठी पुरेसे आर्थिक भांडवल असणे महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ आपल्याकडे जर 5 लाख रुपये कॅपिटल असेल तर याच्या 10% म्हणजेच 50000 रुपये आपण फायदा कमविण्याची शक्यता असते. तोही प्रत्येक महिन्यामधे मि...

पैशाने पैसा वाढतो... पण Mutual Funds मध्ये गुंतवणूक करताना ‘या’ चुका कराल तर सगळा पैसा बुडवेल!

पैशाने पैसा वाढतो... पण Mutual Funds मध्ये गुंतवणूक करताना ‘या’ चुका कराल तर सगळा पैसा बुडवेल! Mutual Fund Investment Mistakes: गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंड एक अतिशय लोकप्रिय गुंतवणूक व्यासपीठ बनले आहे. यामध्ये गुंतवणूक करून भविष्यासाठी एक मोठा निधी निर्माण करता येऊ शकतो. तुम्हीही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना काही सामान्य चुका करत असाल तर, यामुळे आपला नफा कमी होतो किंवा आपल्याला तोटा सहन करावा लागू शकतो. त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीसाठी वेगवेगळे फंड उपलब्ध आहेत. यापैकी, इक्विटी, कर्ज आणि हायब्रिड मुख्य असून यामध्ये SIP, STP आणि SWP द्वारे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी एसआयपी म्हणजे (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. म्युच्युअल फंड SIP मध्ये किमान 12 ते 14 टक्के परतावा मिळतो, पण, लक्षात घ्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील चढ०उतारांवर अवलंबून असते. गेल्या काही महिन्यात देश-विदेशातील शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार झाले असून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदार...

₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम

  एक कोटी रुपयांचा निधी उभारणं हा केवळ श्रीमंतांचा खेळ आहे असं तुम्हाला वाटतं का? जरा एक मिनिट थांबा! जर तुम्ही दर महिन्याला फक्त १,००० रुपयांची बचत करुनही तुम्ही हा टप्पा गाठू शकता. जर तुम्ही दर महिन्याला फक्त १,००० रुपयांची बचत करुनही तुम्ही हा टप्पा गाठू शकता. त्यासाठी फक्त योग्य नियोजन, थोडा संयम आणि कंपाऊंडिंगची जादू लागते. आता कल्पना करा, एसआयपीच्या (SIP) माध्यमातून दरमहा एक हजार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत राहा. एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन - जिथे तुम्ही दरमहा ठराविक रक्कम गुंतवता. ही पद्धत हळूहळू आपल्या छोट्या बचतीचx मोठ्या संपत्तीत रूपांतर करू शकते. फॉलो करा स्टेप-अप ट्रिक मात्र, केवळ एक हजार रुपयांवरून एक कोटी रुपयांपर्यंत जाण्यास बराच कालावधी लागणार आहे. म्हणूनच एका सोप्या युक्तीची गरज आहे - 'अॅन्युअल स्टेप-अप'. याचा अर्थ असा की, आपण दरवर्षी आपल्या एसआयपीची रक्कम थोडीथोडी वाढवत राहता. समजा तुम्ही तुमच्या एसआयपीची रक्कम दरवर्षी १० टक्क्यांनी वाढवता. त्यामुळे पहिल्या वर्षी तुम्ही महिन्याला १००० रुपये गुंतवता, दुसऱ्या वर्षी ते वाढून ११०० रुपये होईल...

५० हजारांची बचत करून ५ कोटी कसे कमवावेत?’, प्रसिद्ध गुंतवणूकदार विजय केडियांनी सांगितलं करोडपती होण्याचं गणित"

 Stock Market : ‘५० हजारांची बचत करून ५ कोटी कसे कमवावेत?’, प्रसिद्ध गुंतवणूकदार विजय केडियांनी सांगितलं करोडपती होण्याचं गणित" शेअर मार्केटमधून पैशातून पैसा कसा कमावला जाऊ शकतो? यामागचं गणित प्रसिद्ध शेअर बाजार गुंतवणूकदार विजय केडिया यांनी सांगितलं आहे. विजय केडियांनी सांगितलं करोडपती होण्याचं 'गणित',  Vijay Kedia On Stock Market : शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांना लवकरात लवकर कमाई मिळणारा स्टॉक हवा असतो. आता शेअर मार्केटमधून पैशातून पैसा कसा कमावला जाऊ शकतो? यामागचं गणित प्रसिद्ध शेअर बाजार गुंतवणूकदार विजय केडिया यांनी सांगितलं आहे. या विषयी त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. विजय केडिया यांनी असं सूचवलं आहे की जर योग्य पद्धतीने गुंतवणूक केली तर वार्षिक ५०,००० रुपयांची बचत होते आणि कालांतराने ५ कोटी रुपयांपर्यंत वाढू शकते. विजय केडिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला. त्या माध्यमातून त्यांनी गुंतवणूकदारांना काही गुंतवणुकीच्या संदर्भात टीप्स दिल्या आहेत. तसेच त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी असंही म्हटलं आहे की, “तुमचा लाखोंचा पगार तुम्हाला ...

कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही

 कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही आजकाल श्रीमंत होण्यासाठी प्रत्येकजण पैसे कमावण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत आहे. पण, फक्त पैसे कमावले म्हणजे झालं असं होत नाही. तर तुम्ही बचत करुन गुंतवणूक करायला हवी. आपण खूप पैसे कमावले म्हणजे श्रीमंत होऊ असा बहुतेक लोकांचा गोड गैरसमज झालेला दिसतो. त्यामुळे लोक पैसे कमावण्याच्या स्पर्धेत रात्रंदिवस धावत आहेत. पण, यातील अनेकांना कमावलेल्या पैशांचं नियोजन कसं करायचं हेच माहिती नाही. त्यामुळे महिन्याच्या शेवटी पैसे हातात उरत नाही, अशी ओरड प्रत्येकाची असते. उत्पन्न वाढवत राहणे जसे महत्त्वाचे आहे, त्याहीपेक्षा कमावलेल्या पैशातून बचत आणि त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे अधिक महत्त्वाचे आहे. आजच्या लेखातून आपण याबद्दलच माहिती घेणार आहोत. investment Tips : आपण खूप पैसे कमावले म्हणजे श्रीमंत होऊ असा बहुतेक लोकांचा गोड गैरसमज झालेला दिसतो. त्यामुळे लोक पैसे कमावण्याच्या स्पर्धेत रात्रंदिवस धावत आहेत. पण, यातील अनेकांना कमावलेल्या पैशांचं नियोजन कसं करायचं हेच माहिती नाही. त्यामुळे महिन्याच्या शेवटी पैसे ...