५० हजारांची बचत करून ५ कोटी कसे कमवावेत?’, प्रसिद्ध गुंतवणूकदार विजय केडियांनी सांगितलं करोडपती होण्याचं गणित"
Stock Market : ‘५० हजारांची बचत करून ५ कोटी कसे कमवावेत?’, प्रसिद्ध गुंतवणूकदार विजय केडियांनी सांगितलं करोडपती होण्याचं गणित"
शेअर मार्केटमधून पैशातून पैसा कसा कमावला जाऊ शकतो? यामागचं गणित प्रसिद्ध शेअर बाजार गुंतवणूकदार विजय केडिया यांनी सांगितलं आहे.
विजय केडियांनी सांगितलं करोडपती होण्याचं 'गणित',
Vijay Kedia On Stock Market : शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांना लवकरात लवकर कमाई मिळणारा स्टॉक हवा असतो. आता शेअर मार्केटमधून पैशातून पैसा कसा कमावला जाऊ शकतो? यामागचं गणित प्रसिद्ध शेअर बाजार गुंतवणूकदार विजय केडिया यांनी सांगितलं आहे. या विषयी त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. विजय केडिया यांनी असं सूचवलं आहे की जर योग्य पद्धतीने गुंतवणूक केली तर वार्षिक ५०,००० रुपयांची बचत होते आणि कालांतराने ५ कोटी रुपयांपर्यंत वाढू शकते.
विजय केडिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला. त्या माध्यमातून त्यांनी गुंतवणूकदारांना काही गुंतवणुकीच्या संदर्भात टीप्स दिल्या आहेत. तसेच त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी असंही म्हटलं आहे की, “तुमचा लाखोंचा पगार तुम्हाला करोडपती बनवत नाही, तर तुमची लाखोंची सेविंग तुम्हाला करोडपती बनवते.” या संदर्भातील वृत्त ‘ईटीनाऊ’ने दिलं आहे.
विजय केडिया यांनी काय म्हटलं?
संपत्ती निर्माण करण्याची गुरुकिल्ली फक्त तुमच्या मोठ्या पगार मिळवण्यात नाही तर त्या पेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे शिस्तबद्ध बचतीच्या सवयीची. तसेच बचतीची सवय, अनावश्यक खर्च टाळणे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे महत्त्वाविषयी त्यांनी सांगितलं. या बरोबरच भविष्यात पैसा कमावण्यासाठी तुम्हाला बचतीवर लक्ष केंद्रित करावं लागले, अशा प्रकारचं आवाहन त्यांनी आजच्या तरुणांना केलं आहे.
विविध गुंतवणुकीच्या अधिक माहितीसाठी भरत कुलकर्णी अकॅडमीस संपर्क करू शकता.
भरत कुलकर्णी अकॅडमी
संपर्क - 90751 90744
Comments
Post a Comment