तुमचं लक्ष आहे का – दर वर्षी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिने आले की आपण घाईघाईने टॅक्स वाचवण्यासाठी कुठे कुठे पैसे गुंतवायचे हे शोधायला लागतो? LIC भरायचं का? PPF सुरू करायचं का? की Fixed Deposit करायचं?
म्हणजे आपण टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक करतो – पण खरं तर याचा उलट विचार करायला हवा:
गुंतवणुकीतून टॅक्स वाचवा!
आज आपण अशाच एका योजनबद्ध आणि फायदेशीर मार्गाबद्दल बोलणार आहोत – ELSS Mutual Fund.
ELSS म्हणजे काय?
ELSS म्हणजे Equity Linked Saving Scheme. हे म्युच्युअल फंडाचे एक विशेष प्रकार आहे, ज्यामध्ये मुख्यत्वे पैसे शेअर बाजारात (इक्विटीमध्ये) गुंतवले जातात आणि त्याचबरोबर Income Tax Act च्या Sec 80C अंतर्गत ₹1.5 लाख पर्यंत कर सवलत मिळते.
थोडक्यात सांगायचं झालं, तर ELSS हा असा फंड आहे, जो तुमचे पैसे वाढवतो आणि करसवलतीचा लाभही देतो!

ELSS चा टॅक्स फायदा कसा मिळतो?
जर तुम्ही ELSS मध्ये गुंतवणूक केली, तर तुम्हाला ती रक्कम (म्हणजे ₹1.5 लाख पर्यंत) तुमच्या एकूण उत्पन्नातून वजा करता येते. यामुळे तुमचं करयोग्य उत्पन्न कमी होतं आणि तुम्ही कमी कर भरता.
उदाहरण:
मानूया, तुमचं वार्षिक उत्पन्न ₹७ लाख आहे. तुम्ही ₹१.५ लाख ELSS मध्ये गुंतवले, तर तुमचं करयोग्य उत्पन्न फक्त ₹५.५ लाख मानलं जाईल. यामुळे तुमचा टॅक्स कमी होतो.
ELSS ची वैशिष्ट्ये
-
Lock-in Period: फक्त ३ वर्षांचा. टॅक्स सेव्हिंग पर्यायांमध्ये सर्वात कमी लॉक-इन कालावधी!
-
हाय रिटर्न्स: इक्विटीमध्ये गुंतवणूक असल्याने, दीर्घकालीन गुंतवणुकीत चांगले परतावे मिळण्याची शक्यता.
-
SIP ऑप्शन: दर महिन्याला SIP ने ELSS मध्ये गुंतवणूक करता येते.
-
Tax on Returns: ELSS मधून मिळालेल्या नफ्यावर ₹1 लाखांपर्यंत LTCG (Long Term Capital Gain) टॅक्स फ्री असतो. त्यानंतर 10% दराने कर लागतो.
ELSS साठी कुणी निवडावं?
-
ज्यांना Tax वाचवायचा आहे आणि ते थोडी जोखीम घेऊ शकतात.
-
ज्या व्यक्तींचं दीर्घकालीन उद्दिष्ट आहे – उदा. मुलांचं शिक्षण, भविष्याचा फंड.
-
नविन गुंतवणूकदार ज्यांना म्युच्युअल फंड सुरू करायचा आहे पण त्याचबरोबर टॅक्सचा फायदा घ्यायचा आहे.
ELSS vs PPF/FD – कुठे गुंतवणूक फायदेशीर?

म्हणजे जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी थोडी जोखीम घेऊ शकत असाल, तर ELSS हा सर्वोत्तम पर्याय आहे.
ELSS मध्ये SIP सुरू करणं कसं फायद्याचं?
दर महिन्याला ₹3,000 SIP सुरू केली आणि ती १० वर्षे चालू ठेवली, तर ELSS तुम्हाला अंदाजे ₹७ लाख ते ₹८.५ लाखपर्यंत फंड तयार करून देऊ शकतो (बाजाराच्या स्थितीनुसार). यावर तुम्हाला ₹1 लाखापर्यंत टॅक्स फ्री परतावा मिळतो.
टॅक्स वाचवा, संपत्ती निर्माण करा
ELSS म्हणजे केवळ टॅक्स वाचवण्यासाठी केलेली गुंतवणूक नाही, तर ती एक संपत्ती निर्माण करणारी दीर्घकालीन योजना आहे. कमी लॉक-इन, चांगले परतावे आणि SIP चा पर्याय यामुळे ELSS प्रत्येक मध्यमवर्गीय गुंतवणूकदाराने लक्षात ठेवावा असा पर्याय आहे.
आजच ELSS SIP सुरू करा – मार्गदर्शनासाठी संपर्क करा:
श्री. भरत कुलकर्णी
Certified Investment Expert & Stock Market Trader
15 वर्षांचा अनुभव
📞 मोबाईल: 9075190744
🏢 Bharat Kulkarni Academy
Comments
Post a Comment