कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
आजकाल श्रीमंत होण्यासाठी प्रत्येकजण पैसे कमावण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत आहे. पण, फक्त पैसे कमावले म्हणजे झालं असं होत नाही. तर तुम्ही बचत करुन गुंतवणूक करायला हवी.
आपण खूप पैसे कमावले म्हणजे श्रीमंत होऊ असा बहुतेक लोकांचा गोड गैरसमज झालेला दिसतो. त्यामुळे लोक पैसे कमावण्याच्या स्पर्धेत रात्रंदिवस धावत आहेत. पण, यातील अनेकांना कमावलेल्या पैशांचं नियोजन कसं करायचं हेच माहिती नाही. त्यामुळे महिन्याच्या शेवटी पैसे हातात उरत नाही, अशी ओरड प्रत्येकाची असते. उत्पन्न वाढवत राहणे जसे महत्त्वाचे आहे, त्याहीपेक्षा कमावलेल्या पैशातून बचत आणि त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे अधिक महत्त्वाचे आहे. आजच्या लेखातून आपण याबद्दलच माहिती घेणार आहोत.
investment Tips : आपण खूप पैसे कमावले म्हणजे श्रीमंत होऊ असा बहुतेक लोकांचा गोड गैरसमज झालेला दिसतो. त्यामुळे लोक पैसे कमावण्याच्या स्पर्धेत रात्रंदिवस धावत आहेत. पण, यातील अनेकांना कमावलेल्या पैशांचं नियोजन कसं करायचं हेच माहिती नाही. त्यामुळे महिन्याच्या शेवटी पैसे हातात उरत नाही, अशी ओरड प्रत्येकाची असते. उत्पन्न वाढवत राहणे जसे महत्त्वाचे आहे, त्याहीपेक्षा कमावलेल्या पैशातून बचत आणि त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे अधिक महत्त्वाचे आहे. आजच्या लेखातून आपण याबद्दलच माहिती घेणार आहोत.
बचतीची सवय लावण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि नियमित प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. खाली काही सोप्या टिप्स दिल्या आहेत.
५०-३०-२० नियम पाळा - तुमच्या पगाराचे योग्य नियोजन करा.
समजा तुमचे मासिक उत्पन्न ३०,००० रुपये आहे.
५०% – जीवनावश्यक वस्तू (भाडे, रेशन, ईएमआय) = १५,००० रुपये
३०% – आनंद (प्रवास, खाणे, छंद) = ९,००० रुपये
२०% – बचत + गुंतवणूक = ६,००० रुपये
गुंतवणूक सुरू कराबचतीचा काही भाग म्युच्युअल फंड, शेअर बाजार किंवा रिअल इस्टेट अशा योग्य ठिकाणी गुंतवणे महत्त्वाचे आहे. एसआयपी म्हणजेच सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन - म्युच्युअल फंडमध्ये दरमहा थोडीशी रक्कम गुंतवा.
जर कोणी दरमहा १०,००० रुपयांची बचत करत असेल आणि ते फक्त बचत खात्यात ठेवत असेल (जिथे त्याला ५% व्याज मिळत असेल). दुसरी व्यक्ती SIP द्वारे म्युच्युअल फंडात तेच १०,००० रुपये गुंतवत असेल (जिथे त्याला १२% परतावा मिळत असेल), तर २० वर्षांनंतर दोघांच्या बचतीत मोठा फरक असेल.
विविध गुंतवणुकीच्या अधिक माहितीसाठी भरत कुलकर्णी अकॅडमीस जत संपर्क करू शकता.
संपर्क 90751 90744
Comments
Post a Comment