स्टॉक मार्केट ट्रेडिंग करून खूप सारे ट्रेडर्स चांगला फायदा मिळवतात, सुरुवातीस ते पार्ट टाइम ट्रेडर म्हणून काम करत असतात पण नंतर जसा त्यांचा अनुभव वाढतो त्यानंतर ते फुल टाईम ट्रेडर म्हणून सुद्धा काम करू लागतात आणि खूप चांगला फायदा कमवतात.
पण तुम्हालाही जर असं वाटत असेल तर खालील गोष्टी समजून घ्यायला हव्यात.
नोकरीत गुंतून राहण्यापेक्षा ट्रेडिंग करून अर्निंग करणे हा खूप चांगला पर्याय. परंतु अजिबात अभ्यास न करता या क्षेत्रात उडी घेऊ नये यासाठी काही गोष्टींची आवश्यकता आहे तसेच भांडवलाची आवश्यकता आहे याची संपूर्ण माहिती घ्यावी.
भावनिक भांडवल:
ट्रेडिंग या क्षेत्रात सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे भावनिक भांडवल. यात प्रामुख्याने कितीही दबावाखाली योग्य निर्णय घेण्याची क्षमता, सातत्याने शिकण्याची तयारी व नुकसान सहन करण्याची मानसिकता असावी लागते.
पुरेसे आर्थिक भांडवल
सातत्याने उत्पन्न मिळवण्यासाठी पुरेसे आर्थिक भांडवल असणे महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ आपल्याकडे जर 5 लाख रुपये कॅपिटल असेल तर याच्या 10% म्हणजेच 50000 रुपये आपण फायदा कमविण्याची शक्यता असते. तोही प्रत्येक महिन्यामधे मिळेलच असे सांगता येत नाही.
फुल टाईम ट्रेडर होण्यासाठी फक्त स्टॉक मार्केटचे ज्ञान असणे महत्त्वाचे नाही तर या सोबतच संयम, शिस्त, चार्टचा अभ्यास करता येणे, फंडामेंटल अनालिसिस माहीत असणे व ग्लोबल मार्केट बद्दल अभ्यास असणे अशा बऱ्याच बाबींचा समावेश होतो.
यासोबतच आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र आर्थिक फंड नियोजनाची सुद्धा गरज असते.
अधिक माहितीसाठी भरत कुलकर्णी अकॅडमी शी संपर्क साधू शकता.
भरत कुलकर्णी अकॅडमी 90751 90744
Comments
Post a Comment