गुंतवणुकीत गोंधळ का होतो? आणि म्युच्युअल फंड हेच उत्तर का असू शकतं? आपण दररोज मेहनत करतो – ८ ते १० तास काम, घराची जबाबदारी, मुलांचं शिक्षण, कर्ज, आणि मग महिन्याच्या शेवटी जेमतेम थोडे पैसे शिल्लक राहतात. अशा वेळी प्रत्येक मनात एकच प्रश्न येतो – "हे पैसे कुठे गुंतवू?" कोणीतरी म्हणतं शेअर्स घ्या, कुणीतरी FD मध्ये ठेवा, तर कुणी सोनं खरेदी सुचवतं. पण या सगळ्या सल्ल्यांमध्ये एक गोंधळ असतो. आजचा लेख या गोंधळावर प्रकाश टाकणारा आहे — आणि त्यातून योग्य पर्याय म्हणून म्युच्युअल फंड कसा उपयोगी ठरतो हे सोप्या शब्दांत सांगणारा आहे. १. गुंतवणूक म्हणजे नेमकं काय? आपण पैसे कमावतो ते आजचं जीवन चालवण्यासाठी. पण गुंतवणूक म्हणजे उद्याचं भविष्य सुरक्षित करणं. मुलांच्या शिक्षणासाठी, निवृत्तीनंतर, एखाद्या मोठ्या स्वप्नासाठी — त्यासाठी लागणारा फंड हळूहळू तयार करणं म्हणजेच गुंतवणूक. २. मग गोंधळ कुठे होतो? गोंधळ होतो कारण: माहितीचा अतिरेक असतो प्रत्येकजण वेगळं सुचवतो जोखीम कळत नाही बाजारातलं चढ-उतार भितीदायक वाटतं यामुळे अनेकजण गुंतवणुकीपासून दूर राहतात, किंवा चुकीची योजना निवडतात. ३. मग म्युच्युअल फंड...
भरत कुलकर्णी अकॅडमी स्टॉक मार्केट कोर्सेसवर सखोल प्रशिक्षण देत असून म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटद्वारे लॉंग टर्ममध्ये नफा मिळवण्यास मदत करते. भरत कुलकर्णी हे MBA फायनान्स पदवीधारक असून त्यांना या क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव आहे. मागील 7 वर्षांत त्यांनी शेकडो लोकांना मार्गदर्शन केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा: 90751 90744