गुंतवणुकीत गोंधळ का होतो? आणि म्युच्युअल फंड हेच उत्तर का असू शकतं? आपण दररोज मेहनत करतो – ८ ते १० तास काम, घराची जबाबदारी, मुलांचं शिक्षण, कर्ज, आणि मग महिन्याच्या शेवटी जेमतेम थोडे पैसे शिल्लक राहतात. अशा वेळी प्रत्येक मनात एकच प्रश्न येतो – "हे पैसे कुठे गुंतवू?" कोणीतरी म्हणतं शेअर्स घ्या, कुणीतरी FD मध्ये ठेवा, तर कुणी सोनं खरेदी सुचवतं. पण या सगळ्या सल्ल्यांमध्ये एक गोंधळ असतो. आजचा लेख या गोंधळावर प्रकाश टाकणारा आहे — आणि त्यातून योग्य पर्याय म्हणून म्युच्युअल फंड कसा उपयोगी ठरतो हे सोप्या शब्दांत सांगणारा आहे. १. गुंतवणूक म्हणजे नेमकं काय? आपण पैसे कमावतो ते आजचं जीवन चालवण्यासाठी. पण गुंतवणूक म्हणजे उद्याचं भविष्य सुरक्षित करणं. मुलांच्या शिक्षणासाठी, निवृत्तीनंतर, एखाद्या मोठ्या स्वप्नासाठी — त्यासाठी लागणारा फंड हळूहळू तयार करणं म्हणजेच गुंतवणूक. २. मग गोंधळ कुठे होतो? गोंधळ होतो कारण: माहितीचा अतिरेक असतो प्रत्येकजण वेगळं सुचवतो जोखीम कळत नाही बाजारातलं चढ-उतार भितीदायक वाटतं यामुळे अनेकजण गुंतवणुकीपासून दूर राहतात, किंवा चुकीची योजना निवडतात. ३. मग म्युच्युअल फंड...
तुमचं लक्ष आहे का – दर वर्षी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिने आले की आपण घाईघाईने टॅक्स वाचवण्यासाठी कुठे कुठे पैसे गुंतवायचे हे शोधायला लागतो? LIC भरायचं का? PPF सुरू करायचं का? की Fixed Deposit करायचं? म्हणजे आपण टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक करतो – पण खरं तर याचा उलट विचार करायला हवा: गुंतवणुकीतून टॅक्स वाचवा! आज आपण अशाच एका योजनबद्ध आणि फायदेशीर मार्गाबद्दल बोलणार आहोत – ELSS Mutual Fund . ELSS म्हणजे काय? ELSS म्हणजे Equity Linked Saving Scheme . हे म्युच्युअल फंडाचे एक विशेष प्रकार आहे, ज्यामध्ये मुख्यत्वे पैसे शेअर बाजारात (इक्विटीमध्ये) गुंतवले जातात आणि त्याचबरोबर Income Tax Act च्या Sec 80C अंतर्गत ₹1.5 लाख पर्यंत कर सवलत मिळते. थोडक्यात सांगायचं झालं, तर ELSS हा असा फंड आहे, जो तुमचे पैसे वाढवतो आणि करसवलतीचा लाभही देतो! ELSS चा टॅक्स फायदा कसा मिळतो? जर तुम्ही ELSS मध्ये गुंतवणूक केली, तर तुम्हाला ती रक्कम (म्हणजे ₹1.5 लाख पर्यंत) तुमच्या एकूण उत्पन्नातून वजा करता येते. यामुळे तुमचं करयोग्य उत्पन्न कमी होतं आणि तुम्ही कमी कर भरता. उदाहरण: मानूया, तुमचं वार्षिक उत...