Skip to main content

Posts

Showing posts from August, 2024

यशाचे सात नियम - स्टॉक मार्केट ट्रेडिंगमधील यशाचा फॉर्मुला

  यशाचे सात नियम - स्टॉक मार्केट ट्रेडिंगमधील यशाचा फॉर्मुला आजच्या काळात गुंतवणूक आणि ट्रेडिंग हे केवळ एक आवडीचे क्षेत्र नाही, तर आर्थिक यशाच्या दिशेने नेणारे एक महत्त्वाचे पाऊल बनले आहे. अनेक लोकांना स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी होण्याची इच्छा असते, परंतु योग्य मार्गदर्शनाच्या अभावी त्यांचे प्रयत्न वाया जातात. "यशाचे सात नियम" या ब्लॉग मध्ये मी स्टॉक मार्केटमधील यशाचा फॉर्मुला सोप्या आणि प्रभावी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.   नियम १ - ध्येय निश्चित करा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही ट्रेडिंगमधील तुमचे ध्येय स्पष्ट करा. कोणत्याही यशस्वी व्यापाऱ्यासाठी ध्येय निश्चित करणे आवश्यक असते. ध्येय निश्चित केल्याने आपल्याला कोणत्या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये यश मिळवायचे आहे हे समजते आणि त्यासाठीची दिशा निश्चित होते. नियम २ - बाजाराची समज विकसित करा बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराची सखोल समज असणे आवश्यक आहे. बाजारातील नाडी समजून घेणे, तांत्रिक विश्लेषण, मूलभूत विश्लेषण आणि बाजाराच्या वेळा समजणे हे महत्वाचे आहे. या नियमामध्ये बाजाराची समज कशी विकसित करावी हे समज...

थेंबे थेंबे करोडपती! यशस्वी गुंतवणुकीचा रोडमॅप

  योगेश आणि राहुल हे दोन मित्र. राहुल कमी कमाई करणारा असला तरी गुंतवणुकीचा शौक ठेवणारा होता. दुसरीकडे, योगेश जास्त कमाई करत होता पण भविष्यातील सुरक्षिततेसाठी काहीच विचार करत नव्हता. त्याला पैसा खर्चायला आणि आरामात जगायला आवडायचे. पंधरावर्षांनी, वेळ कसा बदलतो हे दिसून आले. राहुल, ज्याने नियमितपणे थोडी थोडी गुंतवणूक केली होती, तो एक मोठा कोट्याधीश बनला. त्याच्या हातात सुसज्ज जीवन आणि आर्थिक स्वतंत्रता होती. पण योगेश, जो जास्त कमाई करीत होता पण पैशांचा अपव्यय करत होता, तो आज अडचणीत आणि आर्थिक संघर्षात होता. योगेशला हे समजले की कसे राहुलने यशस्वी आर्थिक जीवन प्राप्त केले आणि त्याने त्याच्याशी विचारपूस केली. योगेशने राहुलला विचारले, “तू कमी कमाई करूनही कोट्याधीश कसा बनला?” राहुल हसला आणि म्हणाला, “योगेश, माझे यश मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीमुळे आले आहे. मी नियमितपणे, थोडक्यात पण सतत गुंतवणूक केली. जरी सुरवातीला तीच गुंतवणूक छोटी वाटली असती, पण दीर्घकाळात त्या गुंतवणुकीचा फायदा झाला. तुझा जो पैसा फुकट गेला, तो माझ्या भविष्यासाठी सुरक्षिततेचा आधार बनला.” राहुलने पुढे सांगितले, “सतत आणि छोट...